उपक्रम

चौकटी बाहेरील शाळा
   जि प प्रा शा खडकावाडी येथे विद्यार्थ्यांना 4 भिंती आड वर्ग खोल्यांत बंदिस्त वातावरणातून सुटका मिळून आनंददायी व निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळावे व शिक्षणाचे प्रत्येक्ष आपल्या जीवनाशी संबंध यावे  या व विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रातील आदर्श विक्तींचे चरित्रातून ,अनुभवातून प्रेरणा मिळावी या मु अ श्री मेहत्रे सर यांच्या संकल्पनेतून "चौकटी बाहेरील शाळा" हा नवोपक्रम सुरू करण्यात आला आहे.
         या उपक्रमन्तर्गत दर महिन्याच्या  3 ऱ्या शनिवारी विविध क्षेत्रातील परिसरात असणाऱ्या नामवंत अधिकारी,राजकारणी,समाजसेवक,डॉक्टर्स,वकील,न्यायाधीश,अभिनेते,लेखक,कवी इत्यादी लोकांचे प्रत्यक्ष शाळेत बोलावून अनुभव कथन ,स्पीच,मुलाखत घेतली जाते.
        तालुक्याचे शिक्षणाधिकारी श्री रवी जोशी साहेब,शालेय पोषण आहार अधीक्षक श्री मकरंद शेवलीकर साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री हरदास सर व केंद्र प्रमुख श्री राऊत सर यांच्या प्रेरणे हा उवक्रम चालू आहे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतूक ही केले.धन्यवाद!💐💐💐

No comments:

Post a Comment